Follow us on Facebook

भ्रमंती

महाराष्ट्रातील जंगले जैवविविधतेने ओतपोत भरलेली आहेत.प्रत्येक जंगलाची वेगळी वैशिष्टय आणि वेगळेसौंदर्य वेगळे आहे.ताडोबाच्या जंगलातील वाघाची हरकाळी, मेळघाटातील नद्यांची खळखळ, नवेगावातील पाहुण्या पक्ष्यांचे विहंगम दृश्य, संजय गांधी उद्यानातील शिल्प्मय शांतता...निसर्गातील अशी विविध रूपे कवेत घ्यावयाची असतील तर अरण्यातील एकांताशी सलगी करावी लागेल. रानवाटा तुद्वाव्या लागतील. महाराष्ट्राला लाभलेल्या संपन्न अरण्य वैभवाचा वेध...


नागझिरा


निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून नागझिर्याचा गौरव केला जातो.जंगलात एक तलं असाव, तळ्याकाठी आज्ञाधारक रक्षकाप्रमाणे उभे असणारे सरळसोट बुन्ध्याचे वृक्ष असावेत, त्या वृक्षांचं प्रतिबिंब तळ्यात पडलेल असावे.तळ्याच्या काठाकाठान जाणारी वाट असावी, आजूबाजूला डोंगरांच्या रांगा  असाव्यात, असं नागझिर्यात आहे.
 

रानात राहून या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या अभयारण्यात आधुनिक दर्जाची निवासगृहे पर्यटकांच्या   सेवेसाठी हजर आहेत.गोंदिया जिल्ह्यातील हे अभयारण्य पानझडी वृक्षांची आहे.१५३ चौ.कि.मी. इतक्या मोठ्या क्षेत्रावर पसरलेल्या या परिसरावर निसर्गाने सर्व रंग मुक्त हस्ताने उधळले आहेत.
साग, अंजन, धावडा, भेह्दा, ऐन, तिवस, साप्तवर्णी , यांचे उंच वृक्ष येथे आढळतात. शिवाय मोह्फुले,चार, आवळा, भेह्डा, टेंभुर्णी इ. फल झाडेही बघावयास मिळतात. आकाशाला भिडणारी बांबूची बेटेदेखील नजरेस पडतात.
वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय, अस्वल, रानकुत्रे, इ.प्राणी इथे मुक्त संचार करतात.     


                                                                                ताडोबा 


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे अभयारण्य व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. ताडोबा अभयारण्यातील वाघांची संख्या ४० पेक्षा अधिक आहे.ताडोबा हे उष्ण कातीबंधातले शुष्क  पानझडीचे जंगल असून वैविध्यपूर्ण वनराईने हा परिसर समृद्ध आहे.साग, बिबळा, धावडा, हलदु, गराडी, ऐन, बांबू, ह्या वनस्पती  इथे आढळतात. वाघ, बिबटे, गवे, अस्वल, रानटी कुत्री, कोल्हे, सांबर, चितळ, नील गायी, चिंकारा ह्या प्रमुख  वण्यश्वापदांची ताडोबाच्या जंगलात वास्तव्य आहे.अनेक प्रकारचे गरुड विशेषतः ससाणे , मोर, रानकोंबडया , बदके, वा इतर स्थलांतरित पाणपक्षी, गोड्या पाण्यातील मगरी यामुळे वन्यजीव अभ्यासकांसाठी तर हे जंगल एक पर्वणीच आहे.  

0 comments:

Post a Comment